Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

केज तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर बलात्कार !

Updated: जानेवारी 3, 2026

By Vivek Sindhu

प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

केज – गौतम बचुटे – दोन मुलाची आई असलेल्या विधवेची सोशल मीडियावर एक तरुणाशी ओळख झाली. त्या नंतर त्या दोघात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्याने तिला तिच्या सोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून वारंवार सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून एके दिवशी त्याने तिच्या इच्छे विरुद्ध घरात घुसून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

केज तालुक्यात एका गावात एका तरुणीचे तेरा वर्षा पूर्वी गावातील एका तरुणाशी लग्न झाले होते. लग्ना नंतर त्यांना दोन अपत्ये झाली. दरम्यान त्या महिलेच्या पतीचे सात वर्षा पूर्वी एका अपघातात मृत्यू झाला. त्या नंतर ती विधवा महिला ही तिच्या दोन मुलांना घेऊन केज तालुक्यातही तिच्या सासरी मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवीत होती. दोन वर्षा पूर्वी तिची गावातील रमाकांत तांदळे या एका ३० वर्षीय अविवाहित तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसबंध निर्माण झाले. ती विधवा महिला ही एकटी व असहाय्य असल्याने रमाकांत तांदळे तिला तीच्याशी लग्न करण्याच्या आमिषाने वेळोवेळी फसवणूक करून सहमतीने तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान शारीरिक संबंध निर्माण करून तिचे लैंगिक शोषण केलेल्या त्या विधवा महिलेला अंधारात ठेवून; रमाकांत तांदळे याने १४ ऑगस्ट २०२५ रोजी अन्य दुसऱ्या तरुणीशी गुपचूप विवाह केला. त्याचे लग्न झाल्या नंतर सुद्धा त्याने दि. ३१ डिसेंबर रोजी ती विधवा महिला घरात एकटी असताना घरात घुसून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने बळजबरीने आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करून अनैतिक असे सबंध प्रस्थापित केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अत्याचारित विधवेने केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून रमाकांत तांदळे याच्या विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच घरात घुसून इच्छे विरुद्ध बळजबरीने लैंगिक अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून त्याच्या विरुद्ध गु. र. नं. ६/२०२६ भा. न्या. सं. ६४(१), ११५(२), ३३३, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

या लैंगिक प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिस आरोपीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


Categories

Recent Posts