Breaking

अंबाजोगाईत कंत्राटदाराविरुद्धच्या कथित खोट्या तक्रारीविरोधात गावकऱ्यांचे पोलिसांना निवेदन; कारवाईची मागणी

Updated: जून 15, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत कंत्राटदाराविरुद्धच्या कथित खोट्या तक्रारीविरोधात गावकऱ्यांचे पोलिसांना निवेदन; कारवाईची मागणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बाजोगाई: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित व्यवसायिकाविरुद्ध कथित स्वरूपात खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेपवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत अंबाजोगाई शहर पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि संबधित तक्रारदारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार, शेपवाडी येथील रहिवासी रेखा उत्तम वंजारे आणि गोविंद रामभाऊ शेप यांनी गावातील प्रतिष्ठित कंत्राटदार चांगदेव पाटलोबा शेप यांच्याविरुद्ध १४ एप्रिल २०२६ रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. मात्र, ही तक्रार पूर्णपणे खोटी आणि पूर्वनियोजित कट रचून करण्यात आली असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. चांगदेव शेप हे गेल्या १० वर्षांपासून एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत यशस्वीरित्या कंत्राटी व्यवसाय करत असून ते अत्यंत प्रतिष्ठित नागरिक आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० ते १०:१५ या वेळेत स्वतः चांगदेव शेप यांच्या घरासमोर अनेक गावकरी एकत्र बसून गप्पा मारत होते. या संपूर्ण कालावधीत तक्रार अर्जात नमूद केलेली कोणतीही आक्षेपार्ह घटना त्या ठिकाणी घडलीच नाही. केवळ वैयक्तिक आकसापोटी आणि संगनमत करून हा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच संबधित संशयित व्यक्ती गावातील लोकांना विनाकारण त्रास देत असून, त्यांना खोट्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या निवेदनावर योगेश मुंडे, दिपक शेप, मच्छिंद्र तरडे यांच्यासह ३२ हून अधिक प्रमुख ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Categories

Recent Posts