Breaking

दुष्काळाचं सावट, ‘एल निनो’मुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार

Updated: जून 13, 2026

By Vivek Sindhu

भारतीय हवामान विभागाचा इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

भारतीय हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली : देशभरात यंदा दुष्काळाचे सावट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने प्रशांत महासागरात एल निनो (El Nino Update) सक्रिय झाल्याची माहिती देत, मान्सूनच्या काळात त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत पावसाचे स्वरूप बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, काही प्रदेशांमध्ये दुष्काळसदृश स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे, ‘एल निनो’च्या (El Nino Update) परिणामामुळे जगातील अनेक भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे.(El Nino Update)

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. भात, सोयाबीन, कापूस, डाळी आणि तेलबियांसह इतर पिकांसाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. पाऊस कमी प्रमाणावर पडल्यास पेरण्या रखडू शकतात. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. शेतकऱ्यांचा खर्च वाढू शकतो. यावरती सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

एल निनो आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी भूतकाळातील अनेक दुष्काळी परिस्थितींमध्ये एल निनोचा प्रभाव जाणवला आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. जर मान्सून अपेक्षेपेक्षा कमी झाला, तर पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम धरणांतील जलसाठ्यावरही होऊ शकतो. तसेच जनावरांसाठी चारा आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. परिणामी, अशा परिस्थितीचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही बसू शकतो.

२००२, २००९ आणि २०१५ या वर्षांमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याची नोंद आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते. याचा मोठा फटका शेतीला होता. काही भागांत दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली होती. प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीच ठरते असे नाही.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो. काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते. दुसरीकडे, काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. पावसातील हा असमतोल विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. याशिवाय, एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

प्रशांत महासागरात एलनिनो सक्रिय झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं ही घोषणा केली
आहे. यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र असा एल निनो राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असाही अंदाज असेल, 2027 च्या पूर्वार्धातही एल निनो सक्रिय असेल असा कयास बांधला जातोय आणि अर्थातच या एल निनोचा मोठा परिणाम हा मान्सूनवर होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राला देखील त्याचा फटका बसू शकतो, सरासरी पेक्षा यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे,एल निनोचा प्रभाव वाढतोय, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे कसे परिणाम होऊ शकतात,एल निनोचे खास करून मान्सूनवर, या प्रश्नावरती माहिती देताना हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं की, सीपीसीने अधिकृतपणे सांगितलं आपण आधीपासूनच म्हणत होतो की एमनो जून मध्ये सक्रिय होणार पण आता आता गेल्या महिन्याभरातला प्रशांत महासागराच तापमान पाहून सीपीसीने कालच जाहीर केलं की, एल निनो सक्रिय झालेला आहे. याची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि ते डिसेंबर पर्यंत सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.(El Nino
एल निनोचे वेगवेगळे टप्पे असतात, म्हणजे तीव्र, अतितीव्र जसा मध्ये आपण सुपर एल निनो असं पण एक संज्ञा वापरली जात होती. अतितीव्र स्वरूपामध्ये म्हणजे तिथलं तापमान हे सरासरी पेक्षा दोन ते अडीच अंशापर्यंत जास्त राहण्याची शक्यता आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तीन अंशापर्यंत पर्यंत राहू शकत त्या त्यापेक्षा पण जास्त राहू शकत पण सीपीसीच्या अंदाजामध्ये तसं दाखवण्यात आलेल नाही, पण तरी सुद्धा 1950 पासूनचा हा सर्वात तीव्र एल निनो राहण्याची शक्यता आहे जेव्हा तीव्र एल निनो असतो तेव्हा त्याचे परिणाम जगामध्ये ज्या ज्या पद्धतीने असतात,तर ते हमखास होतात असं आतापर्यंतच्या याच्यावरून जे काही नोंदी आहेत त्याच्यावरून दिसून आले. त्याच्यापैकी भारत किंवा भारतीय उपखंडावरचा जो त्याचा परिणाम असतो, तो म्हणजे या भागामधला सरासरीपेक्षा पाऊस कमी होत असतो, अर्थात तो पाऊस होतच नाही असं नाही पण तो कमी होतो आणि स्वाभाविकपणे त्याला धरूनच ते अपेक्षित धरून आय एमडीने पण वर्तवले की यंदाचा पावसा सरासरी पेक्षा 90% पर्यंत राहू शकतो, पण त्यामध्ये सुद्धा आपण 5% कमी अधिक धरलेले आहे, त्यामुळे जेव्हा आपण 90% भारतामध्ये पाऊस म्हणतो सरासरीच्या तुलनेमध्ये त्यावेळेस त्याच प्रादेशिक वितरण पण कमी जास्त असतं, त्यामुळे ज्या भागामध्ये पाऊस ऑलरेडी कमी असतो, तिथे आणखीन पण कमी झाला, तर मात्र दुष्काळासारखी स्थिती उद्भवू शकते. एल निनो आता जूनच्या सुरुवातीलाच जाहीर झालाय, की तिथे सक्रिय झालाय त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीपासून जे काही जुलै ऑगस्टमध्ये त्याच्यामध्ये सक्रिय कालखंड असतात, ब्रेक असतात, तर त्याच्यावर सुद्धा एलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संपूर्ण हंगामच एलनिनोच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे, अशी माहिती प्रभुणे यांनी दिली आहे.
आधीच पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे त्याचं कारण देखील एल निनो हेच आहे का? यावर उत्तर देताना प्रभुणे म्हणाले की, याचा एक प्रकारे इनडायरेक्टली कारण ते असू शकत, कारण पाऊस पुढे सरकण्यासाठी किंवा सक्रिय होण्यासाठी मेडन जुलियन ऑसिलेशन म्हणजे एमजेओ हा घटक महत्त्वाचा असतो हे ढगांच क्षेत्र असत विषवृत्ताला धरून ते पूर्वेकडे सरकत असतं आणि हे एमजीओ बराच काळ म्हणजे बरेच आठवडेत भारतीय उपखंडावर आलेलच नाही म्हणजे हिंदी महासागरावर आलेल नाहीय आणि ते प्रशांत महासागरावरच सक्रिय आहे, तर एलनिनो विकसित होत असताना एमजीओ त्याच भागावर बराच काळ राहणं, हे एक आपण त्याच्यामधल कनेक्शन धरू शकतो. आता हे क्षेत्र जून अखेरीस जुलैच्या सुरुवातीला भारतीय उपखंडावर येऊ शकतं, असंअंदाजांमध्ये वर्तवण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला या आखादी देशांकडून पण कोरडे वारे आपल्या वातावरणामध्ये येत तर त्यांनी सुद्धा मॉन्सूनची वाटचाल रोखून धरलेली आहे तर त्यामुळेच की मॉन्सूनच्या प्रगतीमध्ये हा अडथळा निर्माण होतोय, आता त्याच्या मागचं कारण जे आहे त्याच्यामध्ये एलिनिनोची महत्त्वाची भूमिका असू शकते, हे आता या ज्यावेळेस जाहीर झालं की एलिनो सक्रिय झाला त्याच्यावरून हे स्पष्ट होतंय अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.


Categories

Recent Posts