Breaking

रोटाव्हेटरमध्ये अडकून जखमी झालेल्या मंगेशची मृत्यूची झुंज संपली 

Updated: जून 12, 2026

By Vivek Sindhu

उपचारा दरम्यान दहाव्या दिवशी मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

उपचारा दरम्यान दहाव्या दिवशी मृत्यू

केज :- शेतात मशागतीचे काम करीत असलेल्या अवघ्या ३२ वर्षाचा मंगेश टोपे हा ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटर मध्ये अडकून गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दहा दिवसा पासून उपचार सुरू होते आणि ते मृत्यशी झुंज देत होता. अखेर दहाव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आणि दहा दिवसा पासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. 

केज तालुक्यातील साळेगाव येथील पदवीधर असलेला ३२ वर्षीय तरुण मंगेश बाबुराव टोपे हा दि. २ जून रोजी मृग नक्षत्र सुरू होण्या पूर्वी वडिलोपार्जित शेतात खरीप हंगामा पूर्वी शेतातील नांगरटीत भाड्याच्या ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने पेरणीपूर्व मशागत करून शेत पेरणीसाठी तयार करीत होता. ट्रॅक्टर बांधावरून वळण घेत असताना रोटाव्हेटरच्या पात्यात अडकलेला ड्रीपचा पाईप काढण्यासाठी मंगेश ट्रॅक्टरच्या मागील बाजूने वर चढत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि रोटाव्हेटरचे पाते लागून जखमी झाला. त्याच्या पोटाला गंभीर मार लागला होता. तसेच पायाला सुद्धा फ्रॅक्चर झाले होते आणि कानाला सुद्धा जखम.झाली होती. 

अपघात झाल्या नंतर तिथे हजर असलेले रमण डिकले यांनी इतर मित्रांच्या मदतीने जखमी मंगेश टोपे याला तात्काळ उपचारासाठी केज येथे जवळच्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. केज  येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केल्या नंतर नातेवाईकांनी त्याला लातूर येथील खाजगी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या नंतर मंगेश टोपे याच्या पोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर तो भेटायला जाणाऱ्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलत सुद्धा होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना अचानक मागील दोन दिवसा पासून त्याची तब्ब्येत बिघडली आणि त्याचा रक्तदाब कमी-जास्त होत होता. या सर्व परिस्थितीत मंगेश टोपे मृत्यूशी झुंज देत असताना दि. १२ जून रोजी शुक्रवार मध्यरात्री १:३० वाजता लातूर येथे उपचार सुरु असताना निधन झाले आहे.

मंगेश टोपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, पत्नी, आई- वडील आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

मंगेश टोपे हा गरीब आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या अपघाती मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

दि. १२ जून शुक्रवार रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रोड वरील संत सेना महाराज मंदिरा जवळच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Categories

Recent Posts