Breaking

गांज्याच्या अवैध साठ्यावर कारवाई

Updated: जून 12, 2026

By Vivek Sindhu

गांज्याच्या अवैध साठ्यावर कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी – धर्मपुरी येथे राहत्या घरात गांजाची साठवण व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत २०१ किलो ३४० ग्रॅम गांजा एकूण ९,७७,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परळी तालुक्यातील धर्मपुरी आरोपी बाबुलाल उर्फ बबलू भतार हा एका राहत्या घरात गांजाची साठवण करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता घरातून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. २०१ किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ९,७७,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान चाबुलाल उर्फ बबलू भतार बाला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखा पोनि.शिवाजी बंटेवाड़ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


Categories

Recent Posts