Breaking
Updated: नोव्हेंबर 17, 2025
कार्यकारी अभियंत्यांचे गावकऱ्यांना आश्वासन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकार्यकारी अभियंत्यांचे गावकऱ्यांना आश्वासन
केज – वरपगाव (ता. केज) या पुर्नरवसन झालेल्या गावात नागरी सुविधा व रस्ते विकास कामासाठी १० लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने युवाग्राम विकास मंडळाचे कार्यकारी सचिव एच. पी. देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन कामाला गती देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. त्यांनी लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही दिली.
वरपगाव (ता. केज) या पुर्नरवसन झालेल्या गावातील पुर्नरवसनाच्या नागरी सुविधा व अंतर्गत रस्त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरपगाव येथील युवा ग्राम विकास मंडळ या स्वयंसेवी संस्थेने १० डिसेंबर २०२१ रोजी आमदार प्रकाश सोळंके यांना निवेदन देऊन या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून गावाच्या २० वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचा ठोस प्रयत्न केला. यावर प्रतिसाद देत विधानसभेत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी ६ कोटी ७५ लाख निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली. यानंतर २५ डिसेंबर २०२१ रोजी महसूल विभागाने या गावाची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला. तर
पुढे शासन निर्णयानुसार २० मे २०२५ रोजी या कामासाठी १० लाख ९९ हजार मंजूर करण्यात आला. मात्र आणखी या कामाला सुरुवात झाली नसल्याने हे काम तातडीने सुरू करण्यासाठी एच. पी. देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन या कामाला गती देण्याची मागणी करीत संबंधित कार्यालयास निवेदन सादर केले. या निधीतून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.