Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

वाचनालयाची तक्रार केल्यावरून ग्रंथपाल भावास मारहाण

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

दोन गटात हाणामारी ; चौघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिवाचीवाडीच्या बापलेकाविरुद्ध गुन्हा

केज – सार्वजनिक वाचनालयाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यावरून ग्रंथपाल भावास सख्या भावाने व पुतण्याने रस्त्यावर उचलून आपटत व सुबाभळीच्या ओल्या फोकांनी मारहाण केल्याची घटना जिवाचीवाडी (ता. केज) येथे घडली.
जिवाचीवाडी येथील सुभाष सखाराम सारूक हे गावातील कै. श्रीरंगदासजी भुतडा सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल असून त्यांनी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान चा पगार मिळाला नसल्याची तक्रार १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर रात्री ९ वाजता सुभाष सारूक यांना घरातून बाहेर बोलावून त्यांचा भाऊ गोकुळ सखाराम सारूक व पुतण्या आप्पाराव गोकुळ सारूक या दोघा बापलेकानी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार का दिलीस अशी विचारणा केली. त्यावर सुभाष हे एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याचा पगार न मिळाल्याने लेकरा बाळांना काय खाऊ घालू म्हणून पगार न मिळाल्याचा अर्ज दिल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघा बापलेकांनी सुबाभळीच्या फोकांनी त्यांच्या पाठीवर, डाव्या पायाच्या खुब्यावर करीत अंगावर जखमा केल्या. गोकुळ सारूक याने उचलून रस्त्यावर आपटल्याने पायाच्या पंजावर व मनगटावर गंभीर मुक्कामार लागून पाय फॅक्चर झाला. सुभाष सारूक यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोकुळ सारूक व आप्पाराव सारूक या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts