Breaking
Updated: ऑक्टोबर 7, 2025
उसतोडणीतील पैशाच्या वादातून तरुणाची आत्महत्या; दोघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : तालुक्यातील चिकणीतांडा, खळेगाव येथे उसतोडणीच्या पैशाच्या वादातून एका तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन बाळु पवार (वय १७) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.
रंजीत भानुदास पवार (रा. चिकणीतांडा, खळेगाव ता. गेवराई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पुतण्या रोहन बाळु पवार यास आरोपी परमेश्वर शेळके (रा. धारवंटा, ता. गेवराई) व एका अनोळखी इसमाने ऊसतोडणीचे मागील वर्षीचे पैसे न दिल्याने व यावर्षी उचलीचे जास्त पैसे मागितल्याने वाद घालून धमक्या दिल्या. “सामान बांध नाहीतर तुला बांधून घेऊन जाऊ, तू मेले तरी चालेल पण सुट्टी नाही,” अशा शब्दांत आरोपींनी शिवीगाळ केली व ढकलाढकली केली.
या अपमानाने व त्रासाला कंटाळून रोहनने विषारी औषध सेवन केले. त्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपी परमेश्वर शेळके व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार प्रधान हे करीत आहेत.