Breaking
Updated: सप्टेंबर 13, 2025
उपसरपंचाचा हवेत फायरिंगचा व्हिडिओ व्हायरल; तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : रुई गावातील उपसरपंचाने गावातच हवेत फायरिंग करून दहशत निर्माण केल्याची घटना उघड झाली असून या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवाडा पोलिस अंमलदार विठ्ठल गुलाब राठोड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंगेकर यांनी त्यांना व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ पाठवला. या व्हिडिओमध्ये एक इसम एअर गनमधून हवेत फायर करत असल्याचे दिसत होते.
गोपनीय माहितीदारांकडून पडताळणी केली असता तो इसम सचिन अभिमान खरवडे, उपसरपंच रुई (ता. गेवराई, जि. बीड) असल्याचे समजले. तो गावातील प्रतिष्ठित नागरिक असून उपसरपंच पदावर कार्यरत आहे. व्हिडिओमध्ये खरवडे याला खांद्यावर घेतलेले दिसते तसेच सोबत इतर चार-पाच इसम ओरडताना दिसत आहेत.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली. खरवडे यांनी विनापरवाना व बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र हातात घेऊन हवेत फायर करून जनतेत दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात सचिन अभिमान खरवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.