Breaking

तुकाराम मुंढेंचा बीडमध्ये कारवायांचा धडाका; मुदतबाह्य लस्सी नष्ट तर सोयाबीन तेलाचा साठा जप्त

Updated: जून 3, 2026

By Vivek Sindhu

493632ae 4426 44fb 8795 4e4e56db35b6

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोराविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने बीड जिल्ह्यात मोठी मोहीम राबवून धाडसत्र सुरू केले आहे. एफडीएचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने बीड शहरातील विविध लस्सी केंद्रे आणि रिफाइंड सोयाबीन तेलाच्या गोदामांवर अचानक छापे टाकले. या धडक कारवाईत लस्सी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मुदतबाह्य (एक्सपायरी डेट संपलेले) घातक पदार्थ मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले असून दूषित लस्सीचा साठा तातडीने ओतून नष्ट करण्यात आला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही तातडीची कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका गोदामातून संशयास्पद रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठाही अधिकाऱ्यांनी जप्त केला असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात भेसळखोरांचे धाबे दणाणले असून नियमबाह्य काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीडमधील या मोठ्या कारवाईमुळे अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.


Categories

Recent Posts