Breaking

केज येथे शिक्षकाची आत्महत्या

Updated: जून 10, 2026

By Vivek Sindhu

*केज येथे शिक्षकाची आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज:- केज तालुक्यातील कुंबेफळ येथील शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले सूर्यकांत बालासाहेब वाघमारे वय (४१वर्ष) रा. लव्हुरी ता. केज ह. मु. शाहू नगर केज यांनी कमल पेट्रोलियम या रमेश आडसकर यांच्या पेट्रोल पंपाचे बाजूचे शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्मत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या केलेले शिक्षक सूर्यकांत वाघमारे यांची पत्नी सरकारी सेवेत असून त्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. दि. ९ जून रोजी रात्री ९:०० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे यांनी घटनास्थळी हजर होत मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे  केले आहे.

पुढील तपास पोलिस करीत आहेत.


Categories

Recent Posts