Breaking
Updated: जून 10, 2026
पोदार प्रेप अंबाजोगाईला दोन राष्ट्रीय पुरस्कार; शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील पोदार प्रेप या नामांकित शिक्षण संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे. संस्थेला “एक्सेलन्स इन मिडिया आऊटरीच अवॉर्ड २०२५-२६” आणि “किड्यूकेशन शायनिंग अवॉर्ड २०२५-२६” या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आणि गुणवत्तापूर्ण बालशिक्षणातील विशेष योगदानाची दखल घेऊन संस्थेला हे सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. या दुहेरी यशामुळे अंबाजोगाई परिसरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात संस्थेचे मोठे कौतुक होत आहे.
माध्यमांद्वारे विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी प्रसिद्धी केल्याबद्दल पोदार प्रेपने ४४ प्रेस रिलीज प्रकाशित करून देशात तृतीय क्रमांक मिळवला, ज्यासाठी त्यांना मिडिया आऊटरीच पुरस्कार मिळाला. तर बालशिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीकेंद्रित आणि दर्जेदार कार्यासाठी किड्यूकेशन शायनिंग पुरस्काराने गौरवण्यात आले. संस्थेच्या या यशामागे मुख्याध्यापिका मीनाक्षी राठोड आणि प्राचार्य कीर्तीकुमार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रशासकीय अधिकारी प्रताप रसाळ यांचेही सहकार्य लाभले. शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि पालकांच्या विश्वासामुळेच हे यश साध्य झाल्याचे व्यवस्थापनाने म्हटले असून, भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.