Breaking
Updated: नोव्हेंबर 24, 2025
तरुणास काठीने बेदम मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – जमीन मोजायची आहे, अशी थाप मारून एका तरुणास बोलवून घेत सात जणांनी काठीने अंगावर बेदम मारहाण करीत विट डोक्यात मारून डोके फोडल्याची घटना लाखा (ता. केज) येथे घडली.
लाखा येथील शेतकरी अशोक हनुमंत घाडगे (वय ३५) या तरुणास जमीन मोजायची आहे, अशी थाप मारून २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिवारातील शेत गट नं. २७ मध्ये बोलावून घेतले. यावेळी भागवत विठ्ठल घाडगे, मन्मथ विठ्ठल घाडगे, सिध्देश्वर मन्मथ घाडगे, श्रीहरी भागवत घाडगे, कोकीळाबाई भागवत घाडगे, आश्विनी सचिन घाडगे, सचिन भागवत घाडगे (सर्व रा. लाखा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी अशोक या तरुणास काठीने हातावर, पायावर, पाठीवर बेदम मारहाण करीत मुक्कामार दिला. डोक्यात वीट मारून डोके फोडले. अशी तक्रार अशोक घाडगे यांनी दिल्यावरून भागवत घाडगे, मन्मथ घाडगे, सिध्देश्वर घाडगे, श्रीहरी घाडगे, कोकीळाबाई घाडगे, आश्विनी घाडगे, सचिन घाडगे या सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.