Breaking

जागतिक पुस्तक दिनी विद्यार्थ्यांनी केले सामूहिक वाचन

Updated: एप्रिल 23, 2026

By Vivek Sindhu

रोटरी क्लब व स्वामी विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रोटरी क्लब व स्वामी विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम

अंबाजोगाई -: स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित येत
जागतिक पुस्तक दिन सामूहिक वाचन करून साजरा केला.३७८ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर येथे असणाऱ्या इंट्रॅक्ट क्लब मधील विद्यार्थ्यांसोबत सामूहिक वाचन उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शांत वातावरणात बसून विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची गोडी वाढवणे आणि विचारशक्ती विकसित करणे हा होता.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक , शाळेच्या मुख्याध्यापिका स्वरूपा कुलकर्णी ,प्रा. अजय पाठक यांची उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रोहिणी पाठक यांनी त्यांनी सांगितले की,
“पुस्तक हे माणसाचे खरे मित्र असतात. वाचनामुळे ज्ञान वाढतेच, पण व्यक्तिमत्त्वही घडते. विविध गुणांचा विकास घडतो ,मोबाईलच्या युगात मुलांनी पुस्तकांकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्वरूपा कुलकर्णी यांनी वाचन संस्कृती रुजविण्याचे आवाहन केले.


Categories

Recent Posts