Breaking

दत्तपूर व तेलघना येथे ‘हवामान अनुकूल शेती’ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

Updated: एप्रिल 23, 2026

By Vivek Sindhu

दत्तपूर व तेलघना येथे 'हवामान अनुकूल शेती' तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करा वसुंधरेचे संरक्षण : शिवप्रसाद येळकर

अंबेजोगाई (प्रतिनिधी) – जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर अंबेजोगाई तालुक्यातील दत्तपूर व तेलघना येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (एनडीकेएसपी) अंतर्गत ‘हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान’ (सीआरटी) कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. ‘आपली शक्ती, आपला ग्रह’ या संकल्पनेतून पृथ्वी संरक्षणाचा संदेश देत शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड आणि तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी रुंद वरंबा-सरी (बेड) तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून बेडवर हातचलित टोकन यंत्राच्या साह्याने सोयाबीन लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले व टोकन यंत्राद्वारे बियाणे व मजुरी खर्चात बचत कशी साधता येईल, तसेच बेड तयार करताना खत पेरणीचे जुगाड बाबत माहिती दिली. येळकर यांनी मार्गदर्शन करताना शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीतील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शेतातील अवशेष न जाळता त्यापासून कंपोस्ट खत तयार करून वसुंधरेचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. सहाय्यक कृषी अधिकारी एस बी गिरी यांनी डीबीटी पोर्टलद्वारे अनुदानित टोकन यंत्र खरेदी प्रक्रियेचे मार्गदर्शन केले, तर समूह सहाय्यक सरस्वती चाटे यांनी एनडीकेएसपी अंतर्गत विविध योजनांची माहिती दिली. यासोबतच गावात बीजोत्पादन उपक्रम राबवणे व अवजार बँकेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची माहिती येळकर यांनी दिली. या कार्यक्रमाला वैजनाथ गित्ते, शिवदास गित्ते, तुकाराम गित्ते, सुभाष गित्ते, विजयकुमार गित्ते, राजेंद्र पुरी, अर्जुन  गित्ते, रत्नाकर गित्ते, धनंजय पुरी, महादेव गित्ते, केशव  गित्ते, नागनाथ गित्ते, वैजनाथ पुरी, संजय गित्ते, सुग्रीव पुरी, नवनाथ पुरी, आत्माराम दराडे, वैजनाथ सिरसाट, विलास सिरसाट, आत्माराम दराडे, आत्माराम सिरसाट, राजेश सिरसाट, बालासाहेब दराडे, विजय दराडे, साधू दराडे, भास्कर सिरसाट, राजाराम दराडे, अश्विनी दराडे, निलाबाई सिरसाठ, सगुना घुले, अर्चना सिरसाठ आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts