Breaking

बँकेला जागा का देतो? या कारणावरून राक्षसभुवनमध्ये शेतकऱ्याला बेदम मारहाण

Updated: एप्रिल 23, 2026

By Vivek Sindhu

बँकेला जागा का देतो? या कारणावरून राक्षसभुवनमध्ये शेतकऱ्याला बेदम मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: स्टेट बँक ऑफ इंडियाला स्वतःची जागा भाड्याने देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तिघांनी अडवून बेदम मारहाण केल्याची घटना राक्षसभुवन येथे २१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रविंद्र तुळशीराम धुमाळ वय ४२ वर्षे राहणार राक्षसभुवन हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत हजर होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जहुर कम्रोद्दीन काझी, अर्शद समीयोद्दीन काझी आणि विलाज काझी सर्व राहणार राक्षसभुवन यांनी त्यांना अटकाव केला. तू बँकेला जागा कशी काय देतो असे विचारत अर्शद काझी याने हातात असलेल्या काठीने रविंद्र यांच्या उजव्या पायाच्या बोटावर प्रहार करून जखमी केले.

त्यानंतर इतर आरोपी जहुर आणि विलाज काझी यांनी फिर्यादीची गचांडी धरून त्यांना खाली पाडले. आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी डोक्यावर बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर रविंद्र धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक तांगडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts