Breaking
Updated: June 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज : तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात एका वयोवृद्ध दांपत्याच्या शेतातील शेडमध्ये घुसून चौघा चोरट्यांनी तब्बल ७३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा कान फाटून त्यांना गंभीर इजा झाली आहे.
याप्रकरणी समाबाई तुकाराम लाड (वय ८०) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मागील दोन दिवसांपासून त्या आपल्या पतीसोबत लाडेवडगाव शिवारातील अडीच एकर शेतात, पत्र्याच्या शेडमध्ये राहत होत्या.
दि. १७ जून २०२५ च्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास शेडबाहेर झोपलेल्या त्यांच्या पतीला काही अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत झोपेतून उठवले. आवाज ऐकून समाबाई यांनी आतून आवाज दिला असता, त्यातल्याच एकाने दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी समाबाई माझा मुलगा मिल्ट्रीत आहे, त्याला फोन लावते असे म्हणाल्या. मात्र त्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत तुमच्यासोबतच्या दोन लहान मुली कुठे आहेत? असे विचारले. त्यावर घाबरलेल्या समाबाई यांनी ते दोघेच तिथे राहत असल्याचे सांगितले.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, नाकातील ३ ग्रॅमची नथ आणि कानातील ४ ग्रॅमचे फुले, एक साधा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. एक कानातील फुल निघत नसल्याने जबरदस्ती करताना समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखम झाली आहे.
त्यानंतर चारही चोरटे लोखंडी गेटवरून उड्या मारत अंबाजोगाईच्या दिशेने पायी निघून गेले. सर्वांनी चेहऱ्यावर कपडे बांधलेले असल्याने ओळख पटली नाही, मात्र दोघे सडपातळ तर उर्वरित मध्यम शरीरयष्टीचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.