Breaking

रिक्षातील पाण्याच्या बाटलीवरून वाद, चालकाला लोखंडी रॉडने मारहाण

Updated: सप्टेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई : येथील बसस्थानकासमोर रविवारी मध्यरात्री झालेल्या भांडणात एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी करण्यात आले. किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अविनाश शिवाजी मोटे (वय २२, व्यवसाय चालक, रा. यशराज नगर, गेवराई, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ सप्टेंबर रोजी रात्री १२.१० वाजता ते गणपती विसर्जन करुन परतत असताना यशराज चायनीज हॉटेलसमोर आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. महेश चव्हाण याने रिक्षातील पाण्याची बॉटल न दिल्याचा राग धरून हातातील लोखंडी रॉडने अविनाश मोटे यांच्या डोक्यात प्रहार केला तसेच डाव्या हातापायावर मारहाण करून मुक्कामार दिला. दरम्यान आरोपी विजय पवार, सुधीर गव्हाणे आणि महेश खंडागळे यांनी अविनाश मोटे व त्यांचा भाऊ सचिन मोटे यांना चापट्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह सखदे करीत आहेत.


Categories

Recent Posts