Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनातून तंत्रज्ञान अवगत करावे : खा. बजरंग सोनवणे

Updated: नोव्हेंबर 7, 2025

By Vivek Sindhu

केज येथे ग्रामीण कृषी प्रदर्शनास सुरुवात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज येथे ग्रामीण कृषी प्रदर्शनास सुरुवात

केज – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही एक पर्वणी आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवता येईल. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट देऊन तंत्रज्ञान अवगत करावे. असे आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केले.
केज येथे कृषिधन, शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनी यांच्या वतीने ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित ग्रामीण कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी खा. बजरंग सोनवणे हे बोलत होते. कार्यक्रमास हवामान तज्ञ पंजाब डक,
तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे, विकास मिरगणे, हनुमंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. हवामान यावेळी पंजाब डक म्हणाले की, शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार आपलं पीक व्यवस्थापन करावे. तंत्रज्ञाना शिवाय शेतीला पर्याय उरलेला नाही. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी अभ्यासपूर्ण शेती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विशाल चौरे यांनी दोन दिवस हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट, शेतकरी गट, व्यवसायीक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पिक व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. केज तालुक्यात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी, शेतकरी गटांनी
कृषी प्रदर्शनास भेटी देऊन प्रगत शेती मशिनरी, आधुनिक साधने, सुधारीत बीयाणे, खते, किटक नाशके, दुग्धव्यवसाय या विषयी थेट प्रात्यक्षीके आहेत. हे प्रदर्शन शेतकरी, व्यापारी, विक्रेते, वैज्ञानिक, विद्यार्थी यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.


Categories

Recent Posts