Breaking

बेवारस बालिकेस युवाग्राम, पोलिसांनी सोपविले सखी वन स्टॉप सेंटरवर

Updated: June 25, 2025

By Vivek Sindhu

बेवारस बालिकेस युवाग्राम, पोलिसांनी सोपविले सखी वन स्टॉप सेंटरवर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

केज – केज येथील बसस्थानकात बऱ्याच दिवसांपासून बेवारसपणे फिरणाऱ्या बालिकेस पोलीस प्रशासनाने युवाग्राम सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून सुरक्षितपणे रेस्क्यू करीत युवाग्रामचे कार्यकर्ते, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बालिकेची चौकशी करून तिला सुरक्षितपणे बीड येथील सखी वन स्टॉप सेंटर येथे सोपवले.
या बालिकेस बसस्थानकात फिरताना पाहिल्यावर तिथेच राहणारे काही लोक तिला अन्न देत होते. तर ती आपला निवास बसस्थानकावरच करत असल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे बालिकेच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो, या भितीने स्थानिक सामाजिक संघटनांच्या व पोलिसांच्या प्रयत्नांनी बालकाचे रेस्क्यू करणे आवश्यक झाले. यावेळी युवा ग्राम विकास मंडळाचे कार्यकर्ते संतोष रेपे व प्रकाश काळे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन बालिकेच्या संरक्षणाबाबत विनंती केली. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तात्काळ आवश्यक कारवाई करून बालिकेस पुढील योग्य तपासणीसाठी व संरक्षणासाठी बीड येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये सोपवले. या सर्व कार्यवाहीत पोलीस हवालदार त्रिंबक सोपणे, पोलीस नाईक रमा भालेराव, पोलीस नाईक मनीषा कालिके, युवा ग्राम विकास मंडळाचे सदस्य संतोष रेपे व प्रकाश काळे यांनी सहभाग घेतला. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व समाजात बालिकेच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने बालकांचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे हेच आमचे ध्येय आहे. असे संतोष रेपे यांनी सांगितले.