Breaking
Updated: सप्टेंबर 18, 2025
पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तरुणावर कोयत्याने हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : उसने दिलेले पैसे परत घेण्यासाठी बोलावून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित संतोष नंदु सावंत (वय 25, रा. संजयनगर, गेवराई) यांनी फिर्याद दिली आहे.
सावंत हे जुने बसस्थानक, गेवराई येथे असताना जीवन साळवे याने त्यांना सांगितले की विजय जोंधळे (रा. ताकडगाव, ता. गेवराई, जि. बीड) याने पैसे परत करण्यासाठी डॉ. आंबेडकर चौकात बोलावले आहे. त्यानुसार सावंत त्वरित तेथे गेले. चौकातील एका हॉटेलसमोर बसल्यावर त्यांनी पैसे मागितल्यावर विजय जोंधळे थांब असे म्हणाला आणि अचानक जवळील धारदार कोयत्याने डोक्यावर दोन वार करून तसेच उजव्या बगलेजवळ वार करून गंभीर दुखापत केली.
माराच्या भीतीने सावंत उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे गेले. त्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथे रेफर केले. गंभीर दुखापतीमुळे नातेवाईकांनी त्यांना स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, बीड येथे दाखल केले असून सध्या उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी संतोष सावंत यांनी विजय जोंधळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.