Breaking
Updated: जून 16, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने आई आणि सुनेला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून एका मुलाने आपल्या वृद्ध आईला आणि मध्यस्थी करायला आलेल्या भावजयीला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना १० जून २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १५ जून रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानंदा दत्तात्रय माने या ६० वर्षीय वृद्ध महिलेने याप्रकरणी आपली फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महानंदा माने यांच्याकडे आरोपी ईश्वर दत्तात्रय माने याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने वृद्ध आईला कुऱ्हाडीच्या दांड्याने हातावर गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात महानंदा माने यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. आईला वाचवण्यासाठी त्यांची सून मध्यस्थी करायला आली असता, आरोपीने तिच्याही कमरेवर कुऱ्हाडीच्या दांड्याने प्रहार केला. यामध्ये सुनेच्या कमरेच्या मणक्याला गंभीर मुका मार लागला आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता दोघींनाही अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दा