Breaking

बीडमधील हिना नगर भागात बंद घर फोडले; रोख रकमेसह सोन्याची अंगठी लंपास

Updated: जून 16, 2026

By Vivek Sindhu

बीडमधील हिना नगर भागात बंद घर फोडले; रोख रकमेसह सोन्याची अंगठी लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: शहरातील जालना रोडवरील हिना नगर भागातील सटवाई मैदान परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घरफोडी १३ जून २०२६ रोजी दुपारी अडीच ते पाच वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी १५ जून रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक साहेबराव तांगडे या ५४ वर्षीय आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र चालकाने या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांगडे यांचे घर दुपारी बंद असताना अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून सर्व सामान अस्ताव्यस्त केले आणि कपाटात ठेवलेली २२ हजार रुपयांची रोकड तसेच २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची जुनी तुटलेली सोन्याची अंगठी असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. तांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ए) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार सानप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts