Breaking
Updated: जून 15, 2026
चाकूचा धाक दाखवून दांपत्याला लुटले; धारूरच्या दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – अवादा एनर्जी कंपनीच्या २७२/३३ के. व्ही. सबस्टेशनमध्ये लावण्यासाठी आलेला ४५ लाख १० हजार ९६३ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना हांगेवाडी / रामेश्वरवाडी (ता. केज) शिवारात घडली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अवादा एनर्जी कंपनीचे केज तालुक्यात पवनचक्की उभारणीसह हांगेवाडी / रामेश्वरवाडी (ता. केज) शिवारात सर्वे नं. ९९ मध्ये २७२/३३ के. व्ही. सबस्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. या सबस्टेशनला लावण्यासाठी साहित्य आलेले आहे. २८ मे ते ७ जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १३ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे फिक्स कॉन्टॅक्ट फॉर माईन्स ८२ नग, ७ लाख ७९ हजार रुपये किंमतीचे टर्मिनल पॅड ८२ नग, ८ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे मोविंग कॉन्टॅक्ट फॉर माईन्स ४१ नग, १ लाख १६ हजार ८५० रुपये किंमतीचे कॅनोपी फॉर टर्न ट्विस्ट असेंब्ली ४१ नग, १ लाख १० हजार रुपये किंमतीचे नब बोल्ट ८५ नग, ५ लाख ६७ हजार रुपये किंमतीचे फ्लॅट फॉर पॉवर ट्रान्सफॉर्मर ७० मिटर लांबीचा असा ४५ लाख १० हजार ९६३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. श्रीराजा सेक्युरीटी सर्व्हिसेसचे मॅनेजर अमोल लक्ष्मण बहीरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख हे तपास करीत आहेत.