Breaking

पैसे न दिल्याने मेव्हण्याकडून दांपत्याला बेदम मारहाण; अंबाजोगाईत घरगुती वादातून गुन्हा दाखल

Updated: जून 15, 2026

By Vivek Sindhu

पैसे न दिल्याने मेव्हण्याकडून दांपत्याला बेदम मारहाण; अंबाजोगाईत घरगुती वादातून गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील सरस्वती कॉलनी भागात दारूच्या नशेत मेव्हण्याने आपल्याच बहिणीला आणि जावयाला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडी खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करत आरोपीने हा हल्ला चढवला. ही घटना १४ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरस्वती कॉलनी येथे राहणारे बाळू संदीपान देशमुख (वय ४६, व्यवसाय- खाजगी नोकरी) आणि आरोपी आशिष अरविंद चव्हाण हे एकमेकांचे मेव्हणे आहेत. रविवारी सकाळी आशिष हा दारू पिऊन देशमुख यांच्या घरी आला. ‘तुम्ही येथे राहू नका, नाहीतर मला गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये द्या’ असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. देशमुख यांनी नकार देताच आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण करून वळ उमटवले. पतीला वाचवण्यासाठी पत्नी वर्षा मध्ये पडली असता आरोपीने तिलाही हातावर व पाठीवर मारून जखमी केले. या मारहाणीत घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली असून आरोपीने दांपत्याला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित बाळू देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आशिष चव्हाण विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस अंमलदार गायकवाड पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts