Breaking
Updated: डिसेंबर 31, 2025
आठवडी बाजारात चोऱ्या वाढल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज/गौतम बचुटे
केज येथे अज्ञात चोरट्यांनी कृषी मशिनरी दुकानाचा पाठीमागील पत्रा कापून दुकानातील १ लाख ६१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरात घडली.
केज तालुक्यातील सारणी (आ.) येथील कमलाकर महादेव सोनवणे यांचे शहरातील मंगळवार पेठ कॉर्नरला कृषी सेवा व मशिनरीचे दुकान आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री ९:०० वाजता त्यांनी दुकान बंद केल्या नंतर रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागीचा पत्रा कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ५० हजार रुपयांचे ४ एम.एम. चे ५०० मीटर पट्टी केबल वायर, २६ हजार २५० रुपयांचे २.५ एम.एम. चे ३५० मीटर पट्टी केबल वायर, २७ हजार रुपये किंमतीच्या ३ एच पी च्या दोन मोटार, ४ हजार५०० रुपयांच्या अर्धा व एक एच पी च्या दोन मोटार, १९ हजार ५०० रुपयांचे ३ पेरणी यंत्र, ६ हजाराचे ३ प्लॅन लेटर बंडल, ६ हजार २५० रुपयांचे ५ स्टार्टर, ८ हजार रुपयांचे २० अँटिस्विच, ९ हजार रुपयांचे २ पेटी बायोपोनिक, ४७५० रुपयांचे ५ बायोपावर बकेट असा एकूण १ लाख ६१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. कमलाकर सोनवणे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध गु. र. नं. ७०९/२०२५ भा. न्या. सं. ३३१(४), ३०५(अ) नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने हे करीत आहेत.