Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

महिलेचा विनयभंग, पतीस मारहाण

Updated: नोव्हेंबर 13, 2025

By Vivek Sindhu

महिलेचा विनयभंग, पतीस मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय विवाहित महिला ही ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरासमोर कपडे धुत असताना कैलास भिवशण पवार (रा. खरमाटा ता. केज) हा पाठीमागून गेला. त्याने “”तु लई भारी दिसतेस, तु मला आवडतेस. नवऱ्यापेक्षा मी चांगला दिसतो. तु माझ्या सोबत घरात चल असे म्हणत हाताला धरून लज्जा वाटेल असे बोलून विनयभंग केला. त्यानंतर पीडित महिलेचा पती हा त्यास विचारण्यास गेला असता त्याने त्याला शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार पीडित महिलेने दिल्यावरून कैलास पवार याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.

पीडित महिलेच्या पतीसह चौघांवर गुन्हा

तत्पूर्वी, या प्रकरणातील आरोपी कैलास पवार याने दिलेल्या तक्रारीनुसार तो १२ नोव्हेंबर सकाळी ७ वाजता हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असताना पीडित महिलेच्या पती व दिराने या महिलेस काय बोललास ? तू आमच्या घरी का आलास ? असे कारण काढून शिवीगाळ करीत काठीने डोक्यात, छातीवर, पाठीवर, दोन्ही पायावर मारहाण केली. तर महिलेच्या सासू, सासऱ्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. सोडविण्यास आलेल्या आईला मारहाण केली. अशी तक्रार दिल्यावरून पीडित महिलेचा पती, दिर, सासू, सासरे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Categories

Recent Posts