Breaking
Updated: जून 15, 2026
वादळी वाऱ्यात शेतकऱ्याच्या सोलार पंपावर उन्मळून पडले झाड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : वादळी वाऱ्यात तालुक्यातील वरपगांव शिवारातील एका शेतात बसविलेल्या सोलार पंपवरच लिंबाचे झाड पडले. त्यात संपूर्ण सोलार यंत्राणाच चक्काचूर झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमध्ये संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आसून, भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने प्रशासकीय यंत्रणेकडे केली आहे.
मोरेवाडी गावातील रहिवाशी हरिदास भगवानराव सूर्यवंशी यांचे अंबाजोगाई तालुक्यातील वरपगांव शिवारात शेत आहे. या शेतात कुपनलिका घेतली होती. त्यास पाणी लागल्यानंतर तीन एचपीचा सोलार पंप बसविण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामध्ये शेतातील बांधावर असलेले लिंबाचे संपूर्ण झाडच उन्मळून सोलार पॅनलवर पडले. त्यात सोलार पॅनलचे अनेक तुकडे झाले. त्यामुळे सोलार पंपही बंद पडला आहे. त्यातच पावसाने उघडीप दिली आणि शेतातील सोलार पॅनल मोडला असल्यामुळे शेतातील उभे पिक करपू लागले आहे. त्यामुळे सोलार पॅनलची नुकसानभरपाई शासनासह कंपनीने द्यावी अशी मागणीच शेतकरी हरिदास सोमवंशी यांनी केली आहे.