Breaking
Updated: जून 15, 2026
चाकूचा धाक दाखवून दांपत्याला लुटले; धारूरच्या दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – अज्ञात चोरट्यांनी शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून ८३ हजार ३२० रुपयांचे खतांचे ५० पोते चोरून नेल्याची घटना होळ (ता. केज) शिवारात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
होळ (ता. केज) येथील शेतकरी दत्ता अप्पाराव शिंदे यांनी पेरणीसाठी खत खरेदी करून शिवारातील कारीचा माळ नावाच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खतांचे पोते ठेवले होते. ९ जून रोजी रात्री १० वाजेनंतर ते ११ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडच्या दरवाज्याचे कुलूप तोडून शेडमध्ये प्रवेश केला. शेडमधील १०.२६.२६ या खतांचे ४० पोते व युरिया खतांचे १० पोते असे एकूण ८३ हजार ३२० रुपये किंमतीचे खतांचे ५० पोते चोरून नेले. दत्ता शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार गित्ते हे तपास करीत आहेत.