Breaking

नायगावात बिबट्याचा धुमाकूळ हल्ल्यात म्हशीचे वासरू ठार

Updated: जून 17, 2026

By Vivek Sindhu

नायगावात बिबट्याचा धुमाकूळ हल्ल्यात म्हशीचे वासरू ठार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा – तालुक्यातील नायगाव मयूर येथे बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, काल रात्री बिबट्याने एका शेतकर्‍याच्या गोठ्यात घुसून म्हशीच्या वासराला (वगार) जागीच ठार केले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव मयूर येथील शेतकरी श्री. सलीम दादामिया पठाण यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधलेली होती. मंगळवार, दिनांक 16 जून 2026 च्या रात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि बांधलेल्या जनावरांपैकी एका लहान म्हशीच्या वासरावार (वगार) जीवघेणा हल्ला चढवला. बिबट्याने वासराला जागीच ठार करून त्याचे रक्त प्यायल्याचे सकाळी उघडकीस आले. यापूर्वीही अनेक हल्ले नायगाव परिसरात
बिबट्याने धुमाकूळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बिबट्याने अनेक शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांवर आणि वासरांवर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. वारंवार होणार्‍या या हल्ल्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी कमालीचे भयभीत झाले आहेत. पिकांना पाणी देणे किंवा शेतीची कामे करण्यासाठी आता शेतात एकटे जाण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. वन विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.


Categories

Recent Posts