Breaking

अवैध वाळुची चोरटी वाहतुक करणारे टेम्पोवर कारवाई

Updated: June 11, 2025

By Vivek Sindhu

अवैध वाळुची चोरटी वाहतुक करणारे टेम्पोवर कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड – पोउपनि काकरवाल, पोउपनि कुकलारे, पोह/1280 प्रसाद कदम, पोना/1925 दादासाहेब सानप हे पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत पेटोलींग करत असताना रामगड ता.जि.बीड जवळ त्यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वासनवाडी कडुन कुमशीकडे जाणारा रोडवर 09.30 वा. सु.एक टेम्पो टाटा-709 ब्राउन रंगाचा पासींग क्रं. चक-14 एच्-3492 त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीर वाळु चोरीकरुन टेम्पोमध्ये भरुन वाळुची चोरटी विक्री करणे करता जात असताना

मिळुन आल्याने त्यास थांबवुन टेम्पोवरील ड्रायव्हर नामे-गोकुळ किसन गायकवाड रा. वासनवाडी ता.जि. बीड असा चालक मिळुन आल्याने त्यास वाळु वाहतुकी बाबत कायदेशीर परवाना /रॉयल्टी बाबत विचारपुस केली.

असता सदर चालकडे कसलीही वाळु वाहतुकीची रॉयल्टी परवाना मिळुन आला नाही म्हणुन टेम्पो टाटा-709 ब्राउन रंगाचा पासींग क्रं. चक-14 एच्-3492 व त्यामधील अंदाजे दीड ब्रास वाळु अशी एकूण किंमती 609000/- (सहा लाख नऊ हजार) रुपयाचा माल दोन पंचासमक्ष जप्त करुन पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे दादासाहेब नारायण सानप पोना/1925, पो.स्टे बीड ग्रामीण यांचे फिर्यादीवरुन विनापरवाना बेकायदेशिर चोरटी वाहुतक करणारा चालक नामे गोकुळ किसन गायकवाड वय 32 वर्षे रा. वासनवाडी ता.जि. बीड यांचे विरुध्द गुन्हा दाखल करुन मिळुन आलेला चालक आरोपी यास आज दिनांक 10/06/2025 रोजी अटक करण्यात आली आहे.


तसेच कुमशी रोडवरील रामगडाचे बाजुला विनापरवाना अवैध वाळुचा अंदाजे 15 ते 16 ब्रास साठा मिळुन आल्याने महसुल विभागातील मा. तहसीलदार बीड यांचे ताब्यात पुढील कायदेशीर कारवाई कामी देण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत कॉवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बीड कमलेश मिना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि मारुती खेडकर, काकरवाल, पोउपनि कुकलारे, पोह/1280 प्रसाद कदम, पोह/बाळासाहेब दुबाले, पोना/1925 दादासाहेब सानप यांनी केली.