Breaking
Updated: जून 11, 2026
बीड, अंबाजोगाई, परळी सह जिल्हाभरात निदर्शने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी (दि. 11) बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. बीड, आंबेजोगाई, परळी सह जिल्हाभरात आंदोलन करून शासनाच्या कर्जमाफी परिपत्रकाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
किसान सभेच्या वतीने शासनाच्या कर्जमाफी योजनेवर टीका करताना, या योजनेतील अटींमुळे 70 टक्क्यांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप करण्यात आला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून प्रति हेक्टर 17,500 रुपये पीक विमा देण्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात तसेच डीबीटी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या.
आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पी एस घाडगे, कॉ अरुण मते, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भगवान बडे, कॉ विष्णु देशमुख, व्यंकट ढाकणे, कॉ किरण सावजी, कॉ पप्पु देशमुख, खुर्शिद भाई, कॉ विनायक राजमाने, राक्षेसवाडी सरपंच आबा कांबळे, कॉ अशोक नागरगोजे, कॉ शेख इस्माईल, कॉ शंभुलिंग स्वामी यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.