Breaking

आयएमए अंबाजोगाई व रोटरीच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: जुलै 3, 2025

By Vivek Sindhu

आयएमए अंबाजोगाई व रोटरीच्या वतीने 'डॉक्टर्स डे' निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अंबाजोगाई शाखा आणि रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, २६ जणांनी रक्तदान केले.

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, तसेच सामाजिक दायित्व म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसुंधरा सेवा प्रतिष्ठान, जीवनदायी ब्लड बँक, भुतडा हॉस्पिटल, अंबाजोगाई क्लिनिकल लॅब संघटना, रोट्रॅक्ट क्लब अंबाजोगाई, विनोद भैय्या पोखरकर मित्रमंडळ यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.

शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, IMA सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. राजेश इंगोले, दैनिक वार्ता संपादक परमेश्वर गित्ते, IMA अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, सचिव डॉ. उद्धव शिंदे, रोटरी अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, डॉ. अनिल भुतडा, डॉ. मनिषा भुतडा, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सचिन पोतदार यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना नंदकिशोर मुंदडा यांनी, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, समाजाशी नातं जोडण्याचे हे प्रभावी माध्यम आहे,” असे सांगितले. डॉ. इंगोले व परमेश्वर गित्ते यांनीही रक्तदानाचे महत्त्व आणि IMA व रोटरीच्या उपक्रमांविषयी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भुतडा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. अनिल व डॉ. मनिषा भुतडा यांचा काकाजी मुंदडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

IMA अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले, “आयएमए संपूर्ण देशभर कार्यरत असून, अंबाजोगाईमध्येही आम्ही वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. डॉक्टर्स डे हा दिवस सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आणि हे रक्त कोणाच्यातरी प्राणवाचक ठरेल, हीच आमची भूमिका आहे.”

शिबिरात डॉ. एन.पी. देशपांडे, डॉ. ज्योती देशपांडे, डॉ. शुभदा लोहिया, डॉ. संदीप थोरात, डॉ. दीपक लामतुरे, डॉ. प्रल्हाद गुरव, डॉ. विजय लाड, डॉ. बळीराम मुंडे, डॉ. अतुल शिंदे, डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. मनिषा पवार, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. विनोद जोशी, डॉ. सुनील जाधव, डॉ. दीपक पाटील, डॉ. अमोल दहिफळे, डॉ. विजय निकम, डॉ. श्रीनिवास लांब, आदी मान्यवर उपस्थित होते.

रोटरी क्लबतर्फे रो. कल्याण काळे, रो. धनराज सोळंकी, रो. रमेश देशमुख, रो. भीमाशंकर शिंदे, रो. बालाजी घाडगे, रो. जगदीश जाजू, रो. गोरख बापू मुंडे तसेच रोट्रॅक्ट क्लबच्या नवीन अध्यक्ष विशाखा बजाज, सचिव मयूर परदेशी, सर्वेश बजाज, इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

डॉ. नवनाथ घुगे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराला सुरुवात केली. त्यांच्यासह रमेश देशमुख, रोहिणी पाठक, मंदाकिनी गित्ते, राधेश्याम लोहिया, बालाजी घाडगे, विनोद पोखरकर, संगीता नावंदर, डॉ. मनिषा भुतडा, प्रकाश बोरगावकर आदींनी रक्तदान केले. यातील काही रक्तदात्यांनी ७२ वेळा, तर काहींनी २८ वेळा रक्तदान केले असून, त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. हा उपक्रम वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनांचे उदाहरण ठरला.


Categories

Recent Posts