Breaking

पिंपळनेरमध्ये अडीच लाखांची घरफोडी; सुनेवर चोरीचा संशय

Updated: एप्रिल 28, 2026

By Vivek Sindhu

पिंपळनेरमध्ये अडीच लाखांची घरफोडी; सुनेवर चोरीचा संशय

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुजगव्हाण येथे एका घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादीने आपल्याच सुनेवर चोरीचा संशय व्यक्त केला असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

फिर्यादी दिलीप शेषेराव सुरवसे (वय ४०, रा. सुरवसेवस्ती, जुजगव्हाण) यांनी तक्रार दिली आहे की, २६ एप्रिलच्या रात्री अज्ञात व्यक्तीने घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला. कपाटातील प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले १५ तोळे सोन्याचे जुने दागिने, कानातील फुले आणि ११ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. फिर्यादीने आपली सून पल्लवी दादासाहेब सुरवसे हीच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भा.न्या.स. कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts