Breaking

हनुमानवाडी येथे सशस्त्र दरोडा

Updated: June 17, 2025

By Vivek Sindhu

हनुमानवाडी येथे सशस्त्र दरोडा

WhatsApp Group

Join Now

शिरूर कासार – तालुक्यातील मानूर जवळील हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर सोमवार (दि.१६) रोजी मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान अज्ञात तीन चोरटयांनी दरोडा टाकून पती पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली असून चोरटयांनी दोन तोळ्याचे दागिने,रोख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

सविस्तर माहिती अशी कि,शिरूरकासार तालुक्यातील हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर सोमवार (दि.१६) रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यानअज्ञात तीन चोरटयांनी तुपे वस्तीवरील आजुबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून भागवत तुपे यांच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला.या वेळी भागवत तुपे यांच्या पत्नी सरस्वती यांचे तोंड दाबून गळ्यातील मंगळसूत्र काढले.तसेच बाजूला झोपलेले पती भागवत तुपे हे जागे झाल्यामुळे त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून डोके फोडले.तसेच सरस्वती यांच्या पाकिटातील रोख दहा हजार रुपये आणि गळ्यातील तसेच घरात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत.भागवत तुपे यांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सहपोलीस निरीक्षक प्रविण जाधव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी,देवीदास खांडकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.