Breaking

धारूर घाटात सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात

Updated: मे 11, 2026

By Vivek Sindhu

98 1

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर – सोलापूर येथून सिमेंट घेऊन दिंद्रुडच्या दिशेने निघालेला ट्रक घाटातील पहिल्याच धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उतरला. सुदैवाने ट्रक खोल दरीत कोसळला नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकमधील मालाचे नुकसान झाले आहे.
अधिक माहितीनुसार, एमएच. १२. ४९५५ क्रमांकाचा ट्रक सिमेंटची वाहतूक करत धारूर घाटातून जात होता. घाटातील वळणावर रस्त्याची कमी रुंदी आणि धोकादायक उतार यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट रस्त्यावरच कोसळला अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत धारूर घाटातील रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. या घाटात यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे, असे नागरिकांनी सांगितले.


Categories

Recent Posts