Breaking
Updated: मे 11, 2026
एका विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज:- केज तालुक्यात आंतरजातीय विवाह केलेली तरुणी ही तिच्या पती सोबत मोटार सायकली वरून जात असताना एकाने त्यांना रस्त्यात थांबवून स्त्री जातीस लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील शब्दात जातीवाचक शब्दप्रयोग करीत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. : एका विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल
केज तालुक्यातील एका आदिवासी समाजातील तरुणीने एका उच्च वर्णीय तरुणा सोबत सहा वर्षा पूर्वी आंतर जातीय विवाह केलेला असून ते पती पत्नी एकत्रित राहत आहेत. दि. ११ मे रोजी ते दोघे पती पत्नी त्यांच्या गावाकडून केजकडे मोटार सायकल वरून खरेदीसाठी येत होते. त्यांना त्यांच्या गावातील एका ओळखीच्या इसमाने त्यांना पिसेगाव फाट्या जवळ असलेल्या मानवलोक कार्यालयाच्या समोर सकाळी ११:०० वा. च्या सुमारास त्यांचे ओळखीच्या व्यक्तीने हाताने इशारा करून थांबविले. थांबण्यास सांगितले. त्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधील इसम बाळू थोरात हा त्या महिलेच्या पतीला म्हणाला की, ” तू आज तर रिल्समधील पारधी जातीच्या तरुणीला घेवुनच फिरायला लागलास. दोघा भावाने वेगवेगळ्या जातीच्या बायका करून चांगला धंदा मांडलाय.” त्याच वेळी ज्ञानेश्वर थोरात यांनी बाळु थोरात यास म्हणाला की, ” माझी पत्नी असून नीट बोल.” असे म्हणताच बाळू थोरात याने त्या महिलेला २० हजार रु. च्या बदल्यात तिच्या कडून शरीर सुखाची मागणी केली.
त्या महिलेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात बाळू थोरात याच्या विरुद्ध गु. र. नं. २८२/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ३५१(२), ३५२, ३५६ यासह ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू)(i), ३(१)(डब्ल्यू)(ii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभारी पोलिस उपाधिक्षक ऋषिकेश शिंदे हे तपास करीत आहेत.