Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

दिवसा घर फोडून १ लाख ६६ हजाराचे दागिने लांबविले

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

दिवसा घर फोडून १ लाख ६६ हजाराचे दागिने लांबविले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाच्या लॉकरमधील १ लाख ६६ हजार पाचशे रुपयांचे २०० रुपये किंमतीचे सोन्या – चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना खाडेवाडी (ता. केज) येथे २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
खाडेवाडी (ता. केज) येथील संभाजी बन्सी खाडे हे २० नोव्हेंबर रोजी केजला आले होते. तर त्यांची पत्नी गंगूबाई व आई सरसाबाई या दोघी घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेऊन कपाट तोडून लॉकरमध्ये ठेवलेले ४० हजार रुपयांचे ८ ग्रॅमचे सोन्याचे मणी, ३० हजार रुपयांचे ६ ग्रॅमचे सोन्याचे फुलझुंबर, १७ हजार पाचशे रुपयांचे ३.५ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, १५ हजार रुपयांचे ३ ग्रॅमचे सोन्याची ठुशी, ४५ हजार रुपयांचे ९ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, २५०० रुपयांचे चांदीचे चैन, १२०० रुपयांचे चांदीचे जोडावे असा १ लाख ६६ हजार पाचशे रुपयांचे २०० रुपये किंमतीचे सोन्या – चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. संभाजी खाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार राजू वंजारे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts