Breaking

चाकरवाडीत नारळ-पेढ्याच्या गाड्यांच्या वादातून हाणामारी; विक्रेते जखमी

Updated: ऑगस्ट 19, 2025

By Vivek Sindhu

चाकरवाडीत नारळ-पेढ्याच्या गाड्यांच्या वादातून हाणामारी; विक्रेते जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : तालुक्यातील चाकरवाडी येथे नारळ-पेढ्याच्या गाड्यांच्या ठिकाणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. या घटनेत नारळ-पेढे विक्रेते व त्यांच्या मुली जखमी झाले असून नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे एकच्या सुमारास चाकरवाडी येथील माऊली मंदिराजवळ घडली. फिर्यादी वृदावणी आसाराम जाधव (वय ४८, व्यवसाय – नारळ-पेढे विक्रेते, रा. चाकरवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या दोन मुलींसह मंदिराजवळ गाडा लावून नारळ व पेढे विक्री करत होत्या. त्याच वेळी आरोपी भगवान गहिनीनाथ अनवणे याने आपला गाडा जाधव यांच्या गाड्यासमोर लावला. यावरून वाद निर्माण झाला.

वाद वाढताच भगवान अनवणे, त्याची पत्नी उर्मीला अनवणे, अक्षरा मारुती पींपळे आणि अश्विनी अनवणे यांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मुलींवर चाकू, लोखंडी गज व नारळांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. शिवाय, आरोपींनी शिवीगाळ करत पुन्हा चाकरवाडीत गाडा लावल्यास ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या.

या घटनेबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोह. निंगुळे करत आहेत.


Categories

Recent Posts