Breaking

न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या ९६ विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी परीक्षेत यश

Updated: एप्रिल 16, 2026

By Vivek Sindhu

न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या ९६ विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी परीक्षेत यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सलग सोळाव्या वर्षी न्यु व्हिजन पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकाल

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे फेब्रुवारी आणि मार्च-२०२६ महिन्यांत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी वेबसाईटवर जाहीर झाला. त्यात येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने दहावी सी.बी.एस.ई बोर्ड (इंग्रजी माध्यम) परीक्षेत सलग १६ व्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेचे परीक्षेसाठी बसलेले सर्वच्या सर्व ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. घवघवीत यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अंबाजोगाई येथे राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्यांनी एकत्र येत सन २००४ साली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या न्यु व्हिजन पब्लिक स्कूल या शाळेची स्थापना केली. शाळेने स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी – मार्च-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत शाळेच्या सर्वच्या सर्व ९६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून पुन्हा एकदा अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे. शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान प्रतिक धनराज घुले (९८.२० टक्के) या विद्यार्थ्याने पटकावला. तर शौनक मंगेश अकोलकर (९८.०० टक्के) या विद्यार्थ्याने शाळेतून द्वितीय, अनन्या संदीप चव्हाण (९६.०० टक्के) हिने तृतीय आणि संचित सुशीलकुमार मुकडे (९५.४० टक्के) गुण मिळवत गुणानूक्रमे चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेच्या २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. ३० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत तर ११ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. तसेच ३५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपर्यंत गुण प्राप्त केले आहेत. असे सर्व मिळून ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त झाले आहेत हे विशेष होय. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, सौ.डिंपल मोदी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, उपप्राचार्य प्रा.वसंतराव चव्हाण, प्राचार्य डी.एच.थोरात, प्रा.एस.ए.बिराजदार, प्रा.राघवेंद्र राजमान्य, समन्वयक विनायक मुंजे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य पांडुरंग पाटील, समन्वयक रवींद्र राजगुरू, वर्ग शिक्षक नितीन जोशी, प्रविण कुमार, जयशंकर त्रिपाठी तसेच विषय शिक्षक गोपाल कृष्णा, हेमलता मस्के, जयंती दाम, दत्तात्रय नेवल, प्रकाश पांडे, शुभांगी विजापुरे, प्रियंका गित्ते, स्नेहाशिष कुमार, सर्व शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. याशिवाय नियमित अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमध्ये एआयच्या आधुनिक काळात उपयोगी पडतील अशी कौशल्ये जसे की, तज्ज्ञ, अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वर्ग, अटल टिंकरींग आणि रोबोटिक्स लॅब, स्वतंत्र फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी लॅब, प्रत्येक वर्ग खोली मध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, डिजिटल टिचिंग बोर्ड, मॅथ्यस् लॅब, कला व संगीत विषयक विशेष प्रशिक्षण, सुसज्ज कला व क्रीडा विभाग, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने सहभाग आणि स्पृहणीय यश, या सोबतच स्कूल बस, बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग ग्राउंड, थ्री डी पेंटिंग, ब्लॉक कोडींग, कृत्रिम बुध्दीमता या विषयीच्या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. याच संस्थेने टॉडलर्स व्हिले प्री स्कूल ही सुरू केले आहे. या प्री स्कूल मध्ये नर्सरी, एल.के.जी., यु.के.जी. वर्गाची दर्जेदार शिक्षण, अद्ययावत क्रीडांगणे, कृती युक्त अध्यापनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेळोवेळी सरकारने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लगेचच व प्रत्यक्षात सुरू करणारी न्यु व्हिजन पब्लिक स्कूल अंबाजोगाईतील पहिली शाळा ठरली आहे. शाळेने नेहमीच शासन नियमांचे पालन करून गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला आहे. शाळेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात आज मोठ्या पदांवर, हुद्द्यांवर कार्यरत असून ते विविध क्षेत्रात यशस्वी करीअर करीत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नर्सरी, एल.के.जी. यू.के.जी. पहिली ते बारावी पर्यंत सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी कृपया अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु व्हिजन पब्लिक स्कूल, मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड, अंबाजोगाई, जि.बीड येथील (मोबाईल – 8622031111) या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

न्यु व्हिजन पब्लिक स्कूल मधून मिळते दर्जेदार इंग्रजी शिक्षण – संकेत मोदी
अंबाजोगाईत मुंबई, पुणे, नागपुर व छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यु व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले. या शाळेने सतत १६ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवता जोपासली आहे. संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेत्रात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे. येथे नर्सरी, एल.के.जी. यू.के.जी. पहिली ते बारावी पर्यंतचे मराठी व इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, सुसज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, वायफाय परिसर, भाषा विषयक प्रयोगशाळा, गणित व विज्ञान प्रयोगशाळा, ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण, प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा, कला, हस्तकला, मुख्य, संगीत, कराटे प्रशिक्षण, पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत बास्केटबॉल ग्राउंड, प्रशस्त क्रिडांगण, स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र वर्ग या सोबतच सुसज्ज वसतीगृह, प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह, प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी, संतुलित व पोषक आहार, दैनंदिन योगा आणि व्यायाम. सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग, अनुभवी व काळजीवाहक कर्मचारीवृंद, लाँड्री सुविधा, मुलींसाठी स्वतंत्र सुविधा, २४ तास वैद्यकिय व विद्युत सुविधा यासोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहेत. अंबाजोगाईत पहिले सीबीएसई कॉलेज म्हणून न्यु व्हिजन पब्लिक सिनियर सेकन्डरी स्कूल ओळखले जात आहे. अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.


Categories

Recent Posts