Breaking

योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये शुक्रवारी उद्बोधन कार्यशाळा

Updated: एप्रिल 16, 2026

By Vivek Sindhu

योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये शुक्रवारी उद्बोधन कार्यशाळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : येथील योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये शुक्रवारी (दि.१७) सकाळी दहा ते चार ते दुपारी अशा वेळेमध्ये दोन सत्रात नवनिर्वाचित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी उद्बोधन कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन जवाहर नवोदय विद्यालय समितिचे निवृत्त उपायुक्त परमात्मा कन्सल यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे राहाणार आहेत. दुपारच्या सत्रात दीन वाजता लातूर येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य सुभाष मिश्रा यांचे मार्गदर्शन होईल. अध्यक्षस्थानी सैनिक स्कूलचे मेजर एस.पी.कुलकर्णी हे राहातील.

तिसऱ्या समारोप सत्रात दुपारी तिन वाजता बालभारती पुस्तक अभ्यास मंडळाचे सदस्य श्रीधर नागरगोजे हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर हे राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपप्राचार्य व्ही.व्ही. कुलकर्णी, प्रा. आर. वाय. कुलकर्णी, सुमित केजकर यांनी केले आहे.


Categories

Recent Posts