Breaking

बनावट रेशनकार्ड दाखवून चक्क पोलिसांचीच दिशाभूल; गुन्हा दाखल

Updated: सप्टेंबर 9, 2025

By Vivek Sindhu

बनावट रेशनकार्ड दाखवून चक्क पोलिसांचीच दिशाभूल; गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहर पोलीस ठाण्यात बनावट रेशनकार्ड सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी राज पुंजाजी भालशंकर (रा. ढोरगल्लि, खडकपुरा, पेठ बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन सहा. पोलीस निरिक्षक अमोल गणेश गुरले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2022 साली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी राज भालशंकर याला नोटीस बजावून त्याचे मुळ रेशनकार्ड सादर करण्यास सांगण्यात आले होते. आरोपीने स्वतःच्या सहीसह त्याची प्रत पोलिसांना दिली होती.

मात्र पुढील चौकशीत बीड तहसील पुरवठा विभागाने माहिती अधिकाराखाली दिलेल्या उत्तरात असे कोणतेही रेशनकार्ड जारीच झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपीने बनावट दस्तऐवज खरी असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे उघड झाले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार श्रीनिवास बाबूलाल चिंदमवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


Categories

Recent Posts