Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बनावट लग्न प्रकरण नवरीसह बनावट मावशीला न्यायालयीन कोठडी

Updated: डिसेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

बनावट लग्न प्रकरण नवरीसह बनावट मावशीला न्यायालयीन कोठडी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – दोन लाख रुपये घेऊन बनावट लग्न लावले. त्यानंतर तीन तासाने शौचास जाण्याचा बहाणा करीत नवरीने पळून जाण्याचा प्रकार युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. याप्रकरणी नवरीस अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या बनावट मावशीला चाकण (जि. पुणे येथून जेरबंद केले होते. या दोघींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे वास्तव्यास असलेल्या दीपेवडगाव येथील प्रल्हाद गुळभिले या एजंटने नागेश देविदास जगताप (रा. कोदरी ता. अंबाजोगाई) या तरुणाकडून १ लाख ९० रुपये घेऊन त्याचे लग्न प्रीती शिवाजी राऊत या तरुणीशी दीपेवडगाव येथील हनुमान मंदिरात ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता लावले होते. लग्नानंतर नवरी मुलीला सासरी कोदरी येथे घेऊन गेल्यानंतर तीन तासाने नवरी प्रीती राऊत हिने शौचास जाण्याचा बहाणा करीत पळ काढला. तिने पोलिसांशी संपर्क साधला होता. मात्र डिघोळअंबा पाटीजवळ पळून चाललेल्या नवरीला धरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशीत बनावट लग्नाचा प्रकार उघडकीस आला होता. नवरदेव नागेश जगताप यांच्या तक्रारीवरून एजंट प्रल्हाद गुळभिले, नवरी प्रिती राऊत, तिची बनावट मावशी सविता, माया राऊत या चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नवरी प्रीती राऊत हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दरम्यान, युसुफवडगाव ठाण्याचे फौजदार भिमराव मांजरे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्यासह महिला कर्मचाऱ्याने चाकण येथून बनावट मावशी माया राऊत हिला अटक केली. पोलिसांनी नवरी प्रीती राऊत व मावशी माया राऊत या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर या गुन्ह्यातील एजंट प्रल्हाद गुळभिले या मुख्य आरोपीसह आणखी सविता नामक महिला फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


Categories

Recent Posts