Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अल्पवयीन मुलीचा तरुणाने केला विनयभंग

Updated: डिसेंबर 23, 2025

By Vivek Sindhu

अल्पवयीन मुलीचा तरुणाने केला विनयभंग

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – शेतात एकटीच संधी साधून एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा २० वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय शाळकरी मुलगी ही रविवारी (दि. २१) दुपारी शाळेला सुट्टी असल्याने तिच्या शेतात गेली होती. ती एकटीच असल्याची संधी साधून बालाजी दिलीप भांगे या २० वर्षाच्या तरुणाने तिच्या हाताला धरुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी ही दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून बालाजी भांगे याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts