Breaking

शिंदेवाडीत शेतकऱ्याच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

Updated: जून 20, 2025

By Vivek Sindhu

चोरटयांनी फोडले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी – तालुक्यातील शिंदेवाडी येथे घराचा व कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा साधत गुरुवार (दि.१९) रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास अज्ञात चोरटयांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६५,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाभरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अश्यातच मीरा अशोक दरेकर (वय ३०) रा. शिंदेवाडी ता.आष्टी यांच्या घराचा व कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा साधत गुरुवार (दि.१९) रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास अज्ञात चोरटयांनी गळ्यातील सोन्याचे साडेसात ग्रॅमचे गंठण अंदाजे किंमत ३०,००० रुपये,साडेतीन ग्रॅमचे कानातील फुल अंदाजे किंमत १०,००० रुपये,तीन ग्रॅमच्या कानातील काड्या अंदाजे किंमत १५,००० रुपये,एक ग्रॅमचे कानातील हुजूर अंदाजे किंमत ५,००० रुपये,चार भारचे जोडवे १००० रुपये व ४,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ६५,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत .


Categories

Recent Posts