Breaking
Updated: जून 18, 2026
आणल्याच्या बदल्यात पेट्रोल मागून मजुरावर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडस चौकात बंद पडलेली दुचाकी ओढून आणल्याच्या मोबदल्यात २ लिटर पेट्रोल मागण्याच्या कारणावरून एका मजुरावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना १६ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १७ जून रोजी धारूर पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, आडस येथील रहिवासी शहेबाज चाँद शेख (वय २१) याची दुचाकी बंद पडल्यामुळे त्याने ओळखीच्या अमन अकबर शेख आणि स्वप्निल अशोक बलौटा यांना मदतीसाठी बोलावले होते. आरोपींनी त्यांच्या दुचाकीला शहेबाजची दुचाकी बांधून ती ओढत आडस चौकापर्यंत आणली. या कामाच्या बदल्यात आरोपींनी शहेबाजकडे २ लिटर पेट्रोलची मागणी केली. यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे गंभीर हाणामारीत झाले. आरोपी स्वप्निल बलौटा याने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने शहेबाजच्या कानावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच दोन्ही आरोपींनी संगणमत करून त्याला अमानुष शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीवर उपचार सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक पांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.