Breaking
Updated: जून 18, 2026
घरात घुसून दोघा भावांना बेदम मारहाण; वाहनासह घराची तोडफोड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: शहरातील निकम गल्ली येथे जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांवर लोखंडी पाईप आणि लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला १७ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरी झाला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, राजेंद्र शिवाजी चोरमले (वय ३२, व्यवसाय मोबाईल शॉपी व शेती) आणि त्यांचा भाऊ घरात असताना आरोपी बाळू सखाराम निकम व पिनू सखाराम निकम (दोन्ही रा. निकमगल्ली) यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. आरोपींनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या भावाला लोखंडी पाईप आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी घरातील कपाटाची काच, घराबाहेर उभी असलेल्या चारचाकी गाडीची पाठीमागील काच आणि दारात लावलेला बाळराजे दादा पवार मित्र मंडळाचा लॅम्प फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेनंतर राजेंद्र चोरमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार सोनवणे पुढील तपास करत आहेत.