Breaking

शेतात वायर बाजूला ठेवण्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

Updated: जून 17, 2026

By Vivek Sindhu

शेतात वायर बाजूला ठेवण्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारुर: येथील चिंचपूर रोडवरील शेतात खोदकाम करत असताना वॉशिंग सेंटरच्या वायरवरून झालेल्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला लाकडी काठी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १५ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली असून, १६ जून रोजी दुपारी धारुर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारुरमधील कसबा विभागाचे रहिवासी भारत तुळशीराम नांदे हे आपल्या शेतात खोदकाम करत होते. यावेळी त्यांनी आरोपी किरण ऊर्फ बाबू राजाभाऊ शिनगारे याला त्याच्या वॉशिंग सेंटरसाठी अंथरलेले वायर बाजूला काढण्यास सांगितले आणि ते बाजूला ठेवून दिले. मात्र, ‘बाजूला ठेवलेले वायर परत का बुजून घेतले नाहीस?’ असा निरर्थक बहाणा करून आरोपीने वृद्ध शेतकरी भारत नांदे यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. वाद इतका वाढला की आरोपीने लाकडी काठीने नांदे यांच्या दोन्ही पायांच्या मांडीवर पाठीमागून जोरदार प्रहार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने जमिनीवर पडलेला दगड उचलून त्यांच्या पाठीत आणि कानाच्या पाठीमागील बाजूस मारून गंभीर जखमी केले. नांदे जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ‘तुला आता जिवंत सोडणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार गवळी पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts