Breaking
Updated: जून 16, 2026
पैसे न दिल्याच्या वादातून नवगण राजुरी बसस्थानकावर तरुणाला लोखंडी गजाने बेदम मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: तालुक्यातील नवगण राजुरी बसस्थानक परिसरात पैसे न दिल्याच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाला आणि त्याच्यासोबत असलेल्या साक्षीदाराला लोखंडी गज, लाकडी दांडा आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल, १५ जून २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी घडली. याप्रकरणी प्रविण अरुण सुरवसे या शेतकरी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाच गावातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण सुरवसे आणि आरोपी हे एकाच गावचे रहिवासी आहेत. पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी अशोक शरद पवार, शरद गणपत पवार, अमोल शरद पवार आणि सुरज भारत पवार यांनी संगनमत करून प्रविण आणि त्याच्या सोबत्यावर अचानक हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सार्वजनिक बसस्थानकावर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.