Breaking
Updated: जून 15, 2026
महिला मजुराची पर्स हिसकावून दुचाकीस्वार चोरटे पसार; ९ हजारांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: शहरातील अग्रवाल मेडिकलसमोर एका महिला मजुराच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून तीन अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना १३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी १४ जून रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश नगर येथील रहिवासी असलेल्या पदमिनी आनंद जाधव (वय ४५, व्यवसाय-मजुरी) या शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे पायी चालल्या होत्या. त्या अग्रवाल मेडिकलसमोरून जात असताना पाठीमागून एकाच दुचाकीवर तीन तरुण आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या मुलाने पदमिनी यांच्या हातातील पर्स जोरदार झटका देऊन जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तिन्ही आरोपी दुचाकीवरून वेगाने पसार झाले. या पर्समध्ये ४ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीच्या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०४ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस अंमलदार राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.